• महादेवीला परत आणण्यासाठी जमा झालेले स्वाक्षरींचे फॉर्म राष्ट्रपतींकडे रवाना
कोल्हापूर :
महादेवी हत्तीण परत आणण्याचे सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासन देण्याऐवजी ही हत्तीण किती दिवसात परत येणार हे ठोसपणे जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. २ लाख ४ हजार चारशे एकवीस स्वाक्षरींचे फॉर्म राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला गुजरात येथील वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आले. यानंतर आमदार सतेज पाटील यांनी याला जोरदार विरोध केला असून आमदार सतेज पाटील यांनी महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी स्वाक्षरींची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत केवळ ४८ तासात तब्बल सव्वादोन लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. नांदणी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते या फॉर्मचे पूजन झाल्यानंतर आज शनिवारी दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते रमणमळा येथील
पोस्ट कार्यालयामध्ये हे सर्व अर्ज भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांना पाठवण्यात आले. राष्ट्रपतींनी आता यामध्ये लक्ष घालून, महादेवी हत्तीण परत यावी यासाठी, हस्तक्षेप करावा अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली.
दरम्यान, शुक्रवारी वनताराचे सीईओ कोल्हापुरात आले होते. याची कल्पना विरोधी आमदारांना दिली गेली नसल्याने यावर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या सोबत वनताराच्या सीईओ सोबत जिल्हाधिकारी कार्यालय बैठक झाली. विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीचे आता, महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी केवळ आश्वासने न देता किती दिवसात हत्तीण परत येणार हे जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी माजी आ. ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्रकाश पाटील, राजेश लाटकर, शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, युवराज गवळी, ईश्वर परमार, अर्जुन माने, अमर समर्थ, विनायक फाळके, राजू साबळे, दिग्वीजय मगदूम, जय पटकारे, मोहन सालपे, शाशिकांत पाटील, सर्जेराव साळोखे, सुरेश ढोणुक्षे, सुदर्शन खोत, विजय पाटील, सुनिल पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, दिपक मगदूम, संजय पटकारे, सुकमार जगनाडे, राजू वळीवडे, धुळगोंडा पाटील, शितल खोत, रामगोंडा पाटील, किर्ती मसुटे, अविनाश पाटील, संजय नाईक, आण्णासो खोत, राजगोंडा वळिवडे, सचिन चौगले, विजय चौगले, प्रकाश पासान्ना, वैजनाथ गुरव, सुरज पाटील, उदय मसुटे, संजय नाईक, विजय नाईक, रामागोंडा पाटील, प्राचार्य महादेव नरके, बजरंग रणदिवे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किती दिवसात महादेवी परत येणार हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे : आ. सतेज पाटील
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
2.1kmh
0 %
Sat
26
°
Sun
27
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°

