कोल्हापुरात राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करावी
• खासदार शाहू छत्रपतींची केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडावीय यांच्याकडे मागणी
कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील फुटबॉलचा वाढता प्रसार, शंभर वर्षांची परंपरा आणि हजारो खेळाडूंचा सहभाग लक्षात घेता येथे राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करण्याची मागणी खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडावीय यांच्याकडे केली केली आहे.
दरम्यान, खासदार शाहू छत्रपती यांनी बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर कोल्हापुरातही फीफा व एआयएफएफच्या सहकार्याने राष्ट्रीय फुटबॉल अकादमी स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.
खासदार शाहू छत्रपती यांनी क्रीडा मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात कोल्हापूरच्या समृद्ध फुटबॉल परंपरेचा आढावा घेतला असून, शहरात सध्या १२८ नोंदणीकृत संघ, २६८० पेक्षा जास्त खेळाडू आणि सहा महिला संघ कार्यरत असल्याचे नमूद केले आहे.
कोल्हापूर हे कोलकाता, गोवा, केरळ नंतरचे चौथे महत्त्वाचे फुटबॉल केंद्र आहे. १९४० मध्ये छत्रपती राजाराम महाराज व मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज यांच्या प्रेरणेतून ‘कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन’ची स्थापना झाली. ही संस्था एआयएफएफ व वेस्टर्न महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनशी संलग्न आहे.
केएसएच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या केएसए लीग स्पर्धांमध्ये सुमारे २५०० खेळाडू सहभाग घेतात. छत्रपती शाहू स्टेडियमवर येथील मैदानावर आतापर्यंत आयलीग, संतोष ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय महिला सामन्यांचे यशस्वी आयोजन झाले आहे.
कोल्हापूरात फुटबॉल खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर होत असलेल्या फुटबॉल स्पर्धांमधील सामने पाहण्यासाठी दररोज १५ हजारांहून अधिक प्रेक्षक मैदानात उपस्थित राहतात. अशा ठिकाणी राष्ट्रीय फुटबॉल अकादमीची स्थापना झाल्यास देशाला भविष्यात दर्जेदार खेळाडू लाभू शकतात, असा विश्वास खासदारांनी व्यक्त केला.
—————
राष्ट्रीय अकादमीची गरज का?
फुटबॉलची चळवळ असूनही, कोल्हापुरात अद्यापही शासकीय स्तरावर फुटबॉलचे तांत्रिक प्रशिक्षण देणारी एकही संस्था नाही. परिणामी, स्थानिक पातळीवर खेळाडू घडत असले तरी त्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास खुंटतो.
कोल्हापूर हे विमान, रेल्वे व रस्ते अशा सर्व प्रकारच्या दळणवळणाने सज्ज शहर असून येथे पाच थ्री स्टार व एक फाईव्ह स्टार हॉटेलही आहेत. त्यामुळे देशविदेशातील स्पर्धा घेण्यासाठी हे शहर आदर्श ठरू शकते.
——————————————————-
कोल्हापुरात राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करावी
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.6
°
C
27.6
°
27.6
°
78 %
3.7kmh
99 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°