कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) आयोजित फुटबॉल प्रशिक्षकांसाठी रिफ्रेशर कोर्स एकदिवसीय कार्यशाळा रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात आली. या कार्यशाळेला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे इन्स्ट्रक्टर व इंडिया फुटबॉल टीम माजी गोलकीपर रघुवीर खानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ४२ प्रशिक्षकांनी सहभाग घेतला.
मुले आणि मुली यांच्यामध्ये फुटबॉल खेळाची आवड, प्रसार व सर्वांगीण विकास होण्यासाठी फुटबॉल प्रशिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या दृष्टिकोनातून केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व महिला फुटबॉल विभागप्रमुख सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार केएसए च्यावतीने फुटबॉल प्रशिक्षक रिफ्रेशर कोर्सचे आयोजन केले होते.
या रिफ्रेशर कोर्समध्ये मुले व मुली यांचे विविध वयोगट तसेच पुरूष व महिला यांना द्यावयाच्या प्रशिक्षणाच्या विविध पद्धती, खेळामधून सर्वांगीण विकास कसा करावयाचा, मूलभूत कौशल्य व वॉर्म-अप, टेक्निकल व स्किल ट्रेनिंग, गोलकिपींगचे विशेष प्रशिक्षण, प्रथमोपचार देत असताना घ्यावयाची काळजी, प्रशिक्षण फिलॉसॉपी अंतर्गत आनंददायी प्रशिक्षण देण्याची पद्धत, खेळाडू, पालक व प्रशिक्षक यांच्यातील संवाद व विश्वासात्मक नाते इत्यादीबाबतचे प्रात्यकक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.
याप्रसंगी सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये फुटबॉल खेळाच्या ग्रासरूट्स युथ गटा अंतर्गत ८ ते १७ वयोगटातील मुले व मुली यांना या खेळाची आवड निर्माण होण्यासाठी व त्यांना तंत्रशुद्ध अत्याधुनिक मार्गदर्शन मिळणेसाठी प्रशिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. याकरिता आपण सर्वजण प्रयत्न करून कोल्हापूर जिल्ह्याचे मुले व मुली यांचे १३, १५ व १७ वर्षाखालील उत्तम फुटबॉल संघ तयार करून राज्य व राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा नांवलौकिक वाढविणेसाठी आवाहन केले.
केएसएचे पदाधिकारी राजेंद्र दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक व जॉ. जनरल सेक्रेटरी अमर सासने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचा समारोप सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते रघुवीर खानोलकर यांना भेटवस्तू देऊन संपन्न झाला. यावेळी केएसए पदाधिकारी नंदकुमार बामणे व कार्यकारिणी सदस्य दिपक घोडके, प्रदीप साळोखे आदी उपस्थित होते.
केएसएच्यावतीने फुटबॉल प्रशिक्षकांसाठी कार्यशाळा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
8.7kmh
47 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°