• मेंदूच्या ५०० पेक्षा अधिक जटील एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर :
मेंदूच्या शस्त्रक्रिया ह्या अत्यंत जटील व नाजूक असतात. अशा शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाच्या जीविताला अधिक धोका असतो, त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीच्या असतात. मेंदूच्या शस्त्रक्रिया क्षेत्रात गेल्या ५० वर्षात अमुलाग्र बदल होते गेले आहेत. आज मेंदूच्या जटील शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने उल्लेखनीय कार्य केले आहे. याच शृंखलेत मेंदूच्या ५०० पेक्षा अधिक जटील एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया करून अनोखा विक्रम सिद्धगिरी हॉस्पिटलने केला, असल्याची माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, विवेक सिद्ध, राजेंद्र शिंदे, पंकज पाटील, कुमार चव्हाण, अजय कांबळे उपस्थित होते.
डॉ . मरजक्के पुढे म्हणाले, पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या कणेरीमठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने प. महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल ५०० पेक्षा अधिक जटील एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे.
आपण नेहमी विविध शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो, पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रियेची गरज असते. अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील मोजक्याच्या ठिकाणी सर्व उपकरणांसह केली जाते, अन्यथा इतर ठिकाणी हि उपकरणे नसल्यामुळे रुग्णांना गंभीर व कायमची हानी होऊ शकते. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल ५०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडले आहे.
मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो, त्यामुळे मेंदूच्या विकारांवर योग्यवेळी योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. इतर अवयवांच्या शस्त्रक्रियांच्यासाठी एंडोस्कोपी वापरण्यात येते, पण जे अवयावांच्यात पोकळी आहे तिथे एंडोस्कोपचा वापर करण्यात येतो, मेंदू हा पूर्णपणे भरीव असल्यामुळे अशा ठिकाणी एंडोस्कोपिचा वापर अतिशय कुशलतेने करावा लागतो. अशी कुशल टीम सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे कार्यरत असल्यामुळे मेंदूच्या ५०० पेक्षा अधिक रूग्णांच्यावर इंदोस्कोपिक कि-होल सर्जरी येथे यशस्वी करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी डॉ. प्रकाश भरमगौडर म्हणाले की, अशाप्रकारे आधुनिक उपकरणे वापरून व असा अद्यावत इंडोस्कोप वापरून कि-होल सर्जरी अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. मायक्रोस्कोप तंत्रज्ञान, न्युरो नेव्हीगेशन मशीन, न्युरो मॉनेटरिंग प्रणाली सह अनुभवी न्युरो शस्त्रक्रिया तज्ञ, अनुभवी न्युरो भूलतज्ञ यांच्या पूर्णतेतून यशस्वी व सर्वोत्तम अशी एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया यशस्वी होवू शकते. अशा शस्त्रक्रियांच्यासाठी इतर रुग्णालयात सुमारे १० ते १२ लाख रुपये खर्च होतो तर सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये केवळ १ लाख रुपये इतक्या नाममात्र खर्चात होते.
——————————————————-
सिद्धगिरी’मधील न्युरो विभागाचा अनोखा विक्रम
Mumbai
scattered clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
8.7kmh
47 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°