कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने दूधवाढ कृती कार्यक्रम राबवला जात आहे. गोकुळच्या या दूध संकलन वाढ मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीने गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी कागल येथील श्री हसन मुश्रीफ दूध संस्था आणि कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या २० म्हैशी हरियाणा येथून आणल्या आहेत.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत. गोकुळ दूध संघाचे सरासरी १७ ते १८ लाख लिटर प्रतिदिन संकलन आहे. तो २५ लाख लिटरपर्यंत नेण्याचा स्पष्ट संकल्प गोकुळने केला असून, त्यात ६०% दूध म्हशीचे असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले की, दूध उत्पादकांना परराज्यातून जातिवंत म्हैस खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय गोकुळच्या संचालक मंडळाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर महामंडळाच्या माध्यमातून म्हैस खरेदीच्या बिनव्याजी योजना आणलेल्याच आहेत. प्रत्येक दूध उत्पादकाने किमान एक म्हैस जरी खरेदी केली तर कोल्हापूर जिल्ह्यातून म्हैशीचे २० लाखांहून अधिक लिटर दूध संकलन वाढेल.
केडीसीसी बँकेनेही म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्याला दहा हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी गोकुळ दूध संघाच्यावतीने बँकेकडे करणार आहोत. दूध संकलन वाढवण्याच्या दृष्टीने गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष या नात्याने मी स्वतःच २० म्हैसी खरेदी केल्या आहेत. सर्व संचालक, अधिकारी, कामगार आणि दूध उत्पादक शेतकरी यामध्ये सहभागी असून आत्ता अधिक जोमाने या दूध संकलन वाढ मोहिमेमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
————
५४ जनावरांचा गोठा…
गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या शेतातील गोठ्यामध्ये या आधीच्या मुरा जातीच्या दहा म्हशी व दोन रेडे आहेत. त्यांनी हरियाणा राज्यातील जिंद व रोहतक जिल्ह्यांमधून नवीन २० म्हैशी आणल्या. तसेच; लहान २२ रेडकांमध्ये १३ रेडे व नऊ रेड्या आहेत. एकूण ५४ संख्या असलेल्या या सर्व म्हशी, रेडे व रेडके हरियाणा मुरा जातीची आहेत.
म्हैस दूध वाढीचा निर्धार
RELATED ARTICLES
Mumbai
mist
28
°
C
28
°
27.9
°
83 %
5.1kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°