कोल्हापूर :
भारत मंडपम, कन्व्हेन्शन सेंटर, नवी दिल्ली येथे ८३वे शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एसटीएआय) शताब्दी वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शन २०२५ उत्साहात पार पडले. २४ ते २६ जुलै या कालावधीत झालेल्या या अधिवेशनात शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्यावतीने ऊस शेती, सेंद्रिय कर्ब वाढ आणि जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात तांत्रिक संशोधन प्रबंधाचे सादरीकरण करण्यात आले.
तांत्रिक उत्कृष्टता, शाश्वतता आणि वाढ चालविण्याच्या एसटीएआयच्या वारशाच्या १०० वर्ष साजरे करणाऱ्या सर्वात मोठ्या मेळाव्यात साखर आणि सहयोगी उद्योगांमधील उद्योग नेते, तंत्रज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांसह भारतातून आणि परदेशातून १००० पेक्षा अधिक प्रतिनिधी, नवीनतम नवकल्पनांचे १२० स्टॉल्स सामील झाले होते. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर ८० पेक्षा अधिक संशोधन प्रबंध सादर झाले.
संशोधन प्रबंधचे सादरीकरण करताना श्री दत्तचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी कारखान्याने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ऊस उत्पादन वाढीसाठीच्या ऊस विकास योजना, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी केलेले विविध प्रयोग, दहा हजार एकरावरती सच्छिद्र पाईपलाईनच्या माध्यमातून झालेली जमीन क्षारपड मुक्ती आणि प्रत्यक्षात चार हजार एकर जमिनीमध्ये घेण्यात येत असलेले विविध पिकांचे उत्पादन यांचा संपूर्ण आढावा घेऊन माहिती दिली. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या क्षारपडमुक्तीच्या या दत्त पॅटर्नचे कौतुक करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अमित खट्टर, दत्तचे संचालक इंद्रजीत पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मरजे आदी उपस्थित होते.
——————————————————-
आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनात दत्त कारखान्याचे तांत्रिक संशोधन प्रबंधाचे सादरीकरण
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
8.7kmh
47 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°