कोल्हापूर :
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला सेफ्टी मेकॅनिझम फॉर टू व्हीलर या डिझाईनसाठी भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शंभूराज भोसले, हर्ष पटेल यांनी प्रा. नितीन माळी, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हे डिझाईन तयार केले आहे.
रस्त्यावर वळण घेत असताना टू व्हीलर ठराविक अँगलनंतर स्लिप होतात. त्याचा विचार करून ही डिझाईन बनवली आहे. यामध्ये टू व्हीलरला मागील व्हीलला साईड व्हील सपोर्ट दिला आहे. हे साईड व्हील गाडी वळणावर ठराविक अँगल बाहेर कलल्यास ओपन होतात आणि गाडी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. साइड व्हील ओपन झाल्यानंतर गाडी स्लीप होण्याचे प्रमाण कमी होईल,असा या डिझाईन मेकॅनिझमचा उद्देश आहे.
हे पेटंट प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट
RELATED ARTICLES
Mumbai
mist
28
°
C
28
°
27.9
°
83 %
5.1kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°