Homeसामाजिकगणपतराव पाटील यांना पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार प्रदान

गणपतराव पाटील यांना पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार प्रदान

कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना ‘पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे च्यावतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गणपतराव पाटील यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पर्यावरण क्षेत्रात गेली १७ वर्षे एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया ही संस्था काम करीत आहे. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना ‘पर्यावरण भूषण’ आणि ‘पर्यावरण गौरव’ पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये वर्षानुवर्षे क्षारपड असलेली जमीन सुपीक करण्याच्या ध्येयाने गणपतराव पाटील यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच पर्यावरण क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत, याचा विचार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे व खजिनदार सचिन पाटील यांच्यासह राजेंद्र मिरजे उपाध्यक्ष विश्वेश्वरय्या बँक तसेच कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील तसेच  सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
29 ° C
29 °
28.9 °
84 %
3.1kmh
75 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page