Homeशैक्षणिक - उद्योग ‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन

‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन

कोल्हापूर :
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) यांच्यावतीने अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात ‘कॅप’साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबाबत शनिवारी (दि.२६) मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९:३० वाजता होणाऱ्या या सेमिनारमध्ये डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता या संपूर्ण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
अभियांत्रिकीच्या २०२५-२६ या वर्षीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) कशा प्रकारे राबवली जाईल, मेरीट लिस्ट कशी वाचावी, ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करावी, महविद्यालयाला प्राधान्य द्यावे कि आवडत्या शाखेला, कॅपच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या  व चौथ्या फेरीसाठी ऑनलाईन ऑप्शन कसा भरावा, अलॉटमेन्टचे टप्पे व नियम, स्वयं पडताळणीची प्रक्रिया, सीट ॲक्सेप्टन्स टप्पा, अग्रगण्य महाविद्यालयाची कट ऑफ लिस्ट, ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या कोणत्या चुका टाळाव्यात आदी मुद्द्यावर यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
ऑप्शन फॉर्म अचूकपणे भरणे ही अभियांत्रिकी प्रवेशाची अत्यंत महत्वाची पायरी आहे. हा फॉर्म भरताना कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या शंकांचेही निरसन केले जाणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, ॲडमीशन विभाग प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
8.7kmh
47 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page