कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील ५६० हुन अधिक विद्यार्थ्यांना नामांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीची संधी महाविद्यालयाने मिळवून दिली आहे. यामध्ये २७ लाखांचे सर्वोच्च सॅलरी पॅकेज मिळाले असून सरासरी ४.५ लाखांचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले आहे. उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याने यावर्षीही विक्रमी संख्येने प्लेसमेंट करता आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, विद्यार्थ्याना सर्वोत्तम शिक्षण देतानाच, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला दिशा देण्याचे काम केले जाते. गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, आणि नैतिक मूल्यांचा समतोल राखत आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी कार्यरत आहोत. महाविद्यालयाच्या सामुहिक प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे.
ऋतुराज पाटील म्हणाले, महाविद्यालयाचा स्वायत्त दर्जा, नॅक व एनबीए मानांकन, उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा यामुळे सर्वच क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थ्याना नामवंत कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाना चांगले यश मिळाले आहे. आयटी क्षेत्राबरोबरच मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्सच्या विद्यार्थानाही चांगल्या जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत. यावर्षी सुमारे ५६० हून अधिक प्लेसमेंट करता आल्या याचे समाधान आहे.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, यावर्षी १८० हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला. ४० हून अधिक विद्यार्थ्यांना ६ लाख तर सुमारे १५० विद्यार्थांनी ४ लाख पेक्षा जास्त सॅलरी पॅकेज मिळाले आहे. महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागातर्फे कंपन्यांची गरज ओळखून कोडिंग स्किल्स, गुगल डेव्हलपर क्लब, परदेशी भाषा, बिजनेस कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल आणि ऍप्टिट्यूड ट्रेनिंग दिले जाते. याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटवेळी झाला.
यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे , अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.मकरंद काईंगडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या निवडीकरता संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. रविंद्र बेन्नी यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ५६० विद्यार्थ्यांना विविध कंपनीमध्ये नोकरी
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
8.7kmh
47 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°