Homeसामाजिकडॉ. धनंजय दातार यांच्यातर्फे फुफ्फुस विकारग्रस्तांना प्राणवायू उपकरण संच भेट

डॉ. धनंजय दातार यांच्यातर्फे फुफ्फुस विकारग्रस्तांना प्राणवायू उपकरण संच भेट

कोल्हापूर :
फुफ्फुसाच्या विकाराने ग्रस्त, परंतु आर्थिक असहाय्यतेमुळे प्राणवायू पुरवठा उपकरणे खरेदी न करु शकणाऱ्या ६ गरजू रुग्णांना डॉ.धनंजय दातार यांनी स्वखर्चाने असे उपकरण संच भेट दिले. प्रत्येक संचात घरात हवा तेव्हा प्राणवायू पुरवठा करणारे ५ ते १० लिटर्स क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर या उपकरणांचा समावेश होता. याआधी गेल्या वर्षीही ८ रुग्णांना श्री. दातार यांनी अशीच मदत केली आहे.
कोरोनाची प्राणघातक साथ मानवजातीला खूप काही शिकवून गेली. शरीराचे तापमान, रक्तदाब, रक्तशर्करेचे प्रमाण, हृदयाचे ठोके याप्रमाणेच आजकाल श्वासोच्छवासातील प्राणवायूच्या (ऑक्सिजन) पातळीवरही काटेकोर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे. फुफ्फुसांच्या आजारांनी दुर्बळ रुग्णांसाठी शुद्ध प्राणवायूचा तत्काळ पुरवठा अत्यंत मोलाचा ठरत आहे आणि एका श्वासाची किंमत जगाला आता उमगू लागली आहे.
‘प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी रिहॅबिलीटेशन सेंटर’ च्यावतीने श्वसन संस्थेचे आरोग्य आणि प्राणवायूचे महत्त्व अधोरेखित करणारा एक कार्यक्रम नुकताच गोरेगावमध्ये झाला. समाजोपयोगी उपक्रमांना मदतीचा हात देणारे उद्योजक मसालाकिंग डॉ.धनंजय दातार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. फुफ्फुसाच्या विकारानेग्रस्त, परंतु आर्थिक असहाय्यतेमुळे प्राणवायू पुरवठा उपकरणे खरेदी न करु शकणाऱ्या ६ गरजू रुग्णांना दातार यांनी स्वखर्चाने असे उपकरण संच भेट दिले.
याप्रसंगी बोलताना डॉ. धनंजय दातार म्हणाले, माझ्या आईच्या अखेरच्या दिवसांत ती फुफ्फुसाच्या आजाराने गलितगात्र झाली होती. श्वासोच्छवासासाठीची तिची धडपड मला बघवत नव्हती. आजही अशा आजारांनी ग्रस्त गरीब रुग्णांचे हाल मला अस्वस्थ करतात. कोरोना साथीच्या काळात तत्काळ प्राणवायू न मिळाल्याने अथवा वाहनाच्या अनुपलब्धतेमुळे रुग्णालयात वेळेवर पोचू न शकल्याने अनेक रुग्ण दगावले. त्यावर उपाय म्हणून मी व माझ्या समूहाने ऑक्सिजन सिलेंडरने सज्ज ‘रिक्षा ॲम्ब्युलन्स’ या अभिनव उपक्रमाला आर्थिक पाठबळ पुरवले. गेल्यावर्षी आणि यंदाही पैशाअभावी प्राणवायू उपकरणे खरेदी करु न शकणाऱ्या रुग्णांना आम्ही प्राणवायू संच भेट दिले आहेत आणि यापुढेही गरीब गरजूंना अशीच मदत करत राहणार आहोत.
डॉ. पूर्वी देवानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी रिहॅबिलीटेशन सेंटर’चे संस्थापक चालक डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई व त्यांच्या पत्नी वैशाली प्रभुदेसाई यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
29 ° C
29 °
28.9 °
84 %
3.1kmh
75 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page