कोल्हापूर :
कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात सुरु असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ड्रेनेज लाईन आणि पंम्पिंग स्टेशनसह पंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामे कोणत्याही परिस्थितीत मुदतीत व गतीने पूर्ण करा. या कामांमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना देऊन सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणांना वेळोवेळी भेटी देऊन सद्यस्थितीचा अहवाल दर महिन्याला जिल्हा प्रशासनाला सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही शहरातील व जिल्हा परिषद क्षेत्रातील एसटीपी, ड्रेनेज लाईन, पम्पिंग स्टेशनच्या कामात विलंब आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले नदी प्रदूषण कमी होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा वेळोवेळी घेण्याच्या दृष्टीने यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात येईल. तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी भेटी देऊन कामाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. तसेच संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत वेळोवेळी बैठका घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा.
पंचगंगा प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उपाययोजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा, या कामात विलंब होणार नाही याची दक्षता घ्या. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल, याची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी दि
पंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामे मुदतीत पूर्ण करा : जिल्हाधिकारी
Mumbai
overcast clouds
28.3
°
C
28.3
°
28.3
°
79 %
6.7kmh
98 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°