कोल्हापूर :
ऊन, वारा आणि पाऊस या कशाचीही पर्वा न करता हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशन आयोजित ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून अत्यंत उत्साहात आणि शिवमय वातावरणात ही मोहीम नुकतीच पार पडली. या ७२ व्या मोहिमेत महाराष्ट्र राज्यातील तसेच राज्याबाहेरील ५७० हून अधिक मोहिमवीर सहभागी झाले होते.
पन्हाळा ते पावनखिंड या पदभ्रमंती मोहिमेला शनिवारी पन्हाळगडावर प्रारंभ झाला. ५२ किलोमीटरची ही पदभ्रमंती मोहीम दगड-धोंडे, चिखल, घनदाट जंगल, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा सामना करत रविवारी पावनखिंडीत यशस्वीरित्या पोहोचली. ऐतिहासिक मार्गावरील अनेक वाड्या-वस्त्या पार करत मोहिमवीरांनी शिवकालीन इतिहासाची अनुभूती घेतली. सर्वात लहान व सर्वात मोठ्या मोहिमवीरास कै. सुरज ढोली व कै. युवराज साळोखे यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देण्यात आले.
पावनखिंड येथे पोहोचल्यानंतर स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर मावळ्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, चंदगडचे व पन्हाळा येथील तहसीलदार इंगळे आणि एव्हरेस्टवीर भगवान चवले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी निसर्ग अभ्यासक प्रमोद माळी यांनी खिंडीचा प्रेरणादायी इतिहास कथन केला. याप्रसंगी मोहिमवीरांनी केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘नरवीर मावळे अमर रहे’ या घोषणांनी पावनखिंडीचा परिसर दणाणून गेला.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हिल रायडर्सचे सर्व शिलेदार अहोरात्र झटले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच ही ७२वी पदभ्रमंती मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली
हिल रायडर्सची पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
8.7kmh
47 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°