Homeसामाजिकडी. वाय. पाटील हॉस्पिटल राज्यातील रुग्णालयांसाठी रोल मॉडेल

डी. वाय. पाटील हॉस्पिटल राज्यातील रुग्णालयांसाठी रोल मॉडेल

• आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे गौरवोद्गार
कोल्हापूर :
कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल हे राज्यातील सर्व धर्मादाय, खाजगी आणि शासकीय खाजगी हॉस्पिटलसाठी एक ‘रोल मॉडेल’ आहे. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार व सुविधा माफक किंमतीत देण्याचा डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज, नूतनीकरण केलेल्या आर्थोपेडिक वॉर्डचे उदघाटन आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या हस्ते  झाले.
डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, उप अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पाटील यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देऊन उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. हॉस्पिटलच्या सिम्युलेशन लॅबचे त्यांनी विशेष कौतुक केले.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील स्वच्छता, उपचार पद्धती, तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिळणारी वागणूक या सर्वच गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहेत. या हॉस्पिटलमध्ये मिळणारी सेवा व कार्यपद्धती ही राज्यातील सर्व रुग्णालयांसाठी रोल मॉडेल आहे. ते पुढे म्हणाले, हॉस्पिटलच्या अत्याधुनिक ऑर्थोपेडिक वार्डमुळे कोल्हापूरसह आसपासच्या परिसरातील लोकांना हाडासंबंधीच्या सर्व विकारावर अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. हा विभाग कोल्हापूरच्या आरोग्य सेवेतील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
कुलपती डॉ. संजय पाटील म्हणाले,  डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सातत्याने गुणवत्तापूर्ण सेवा देत आहोत. नव्या ऑर्थोपेडिक वॉर्डमुळे रुग्णांना हाडासंबंधी विकारांवर अतिशय जलद,  कार्यक्षमपणे आधुनिक उपचार मिळणार आहेत.
याप्रसंगी विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी हॉस्पिटलमधील विविध सुविधांची तर ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील यांनी विभागातील उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, डॉ. सलीम लाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.3 ° C
28.3 °
28.3 °
79 %
6.7kmh
98 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page