कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालय (अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्था)च्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने ‘Saturday Wheel’ उपक्रमांतर्गत ५६वा बँक राष्ट्रीयीकरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम साबळे यांनी केले. बँकांच्या विविध लोगोचे अर्थ व त्यामागील संकल्पना रोशन खवरे यांनी अत्यंत रंजक पद्धतीने समजावून सांगितल्या. वैष्णवी सावंत यांनी राष्ट्रीयीकृत बँकांचे स्लोगन्सचे- घोषवाक्य मनोरंजक पद्धतीने सादर केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कैलास पाटील यांनी बँक राष्ट्रीयीकरणाचा इतिहास, त्यामागील गरज व महत्त्व, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी घेतलेला निर्णय आणि यातून घडलेले वित्तीय समावेशान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बँक राष्ट्रीयीकरण तथा बँकिंग क्षेत्राचे सामाजिक-आर्थिक महत्त्व याची जाणीव निर्माण झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खतीजा किल्लेदार यांनी केले तर आभार यश पाटील यांनी मानले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. ए. बी. वसेकर, डॉ. संपदा टिपकुर्ले, डॉ. संदीप पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात बँक राष्ट्रीयीकरण दिन साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
3.6kmh
0 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
26
°

