कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आयव्हीएफ व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्रा’चे शनिवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, सिद्धगिरी जननी आयव्हीएफ व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या मुख्य संचालिका व विभाग प्रमुख डॉ. वर्षा पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा आदी उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयात सुरू होणारे हे पहिले केंद्र आहे. येथे गरजू वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना सल्ला व उपचार उपलब्ध होणार आहेत. या केंद्रात गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत सल्ला व आय.यू.आय. उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, पूर्वीच्या काळी वंध्यत्वाच्या समस्या अत्यंत कमी प्रमाणात होते. आज कालची बदलती जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे, हि एक भीषण समस्या बनत चालली आहे. लोकांनी जर वेळेत उपचार घेतले तर पुढील महागडे उपचार टाळणे शक्य होऊ शकते. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या आशीर्वादाने सिद्धगिरी जननी सेंटच्या डॉ. वर्षा पाटील यांच्या पुढाकाराने महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या सहयोगाने शासकीय स्तरावर हे उपचार आता मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यात याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे याचा मला अभिमान आहे.
यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, सिद्धगिरी जननीच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार विवेक सिद्ध तर प्रास्ताविक डॉ. प्रकाश पावरा यांनी केले.
यावेळी डॉ. विवेक हळदवणेकर, डॉ. वृषाली घोरपडे, डॉ. भूषण सुतार, उपशहर अभियंता अरुण गुजर, नोडल ऑफिसर डॉ. अमोल माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, डॉ. विद्या काळे-हेरवाडे, सुजित पाटील, कुमार चव्हाण, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स उपस्थित होते.
सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Mumbai
mist
29
°
C
29
°
28.9
°
84 %
3.1kmh
75 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°