कोल्हापूर :
कोल्हापूर विभागातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह शनिवारी उत्साहात पार पडला.
कोल्हापूर, बेळगाव, सांगली कराड, बार्शी व सोलापूर येथून सुमारे २२८ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. यामधून साधारण ६०हून अधिक विद्यार्थ्यांची अंतिम फेरीत निवड झाली.
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आपल्या फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच एक सामाजिक जाणीव म्हणून अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठीसुध्दा नोकरीची संधी निर्माण करून देण्यासाठी कोल्हापूर येथे सलग दुसऱ्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हसाठी गोवा येथून ब्लू क्रॉस, मुंबईमधून वेलनेस फॉरेवर, जेनेरीकार्ट, सिरॉन, पुणे येथून एम बी केमिकल्स व निवान लॅब्स या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी औषधनिर्माण शाखेतील विविध पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठी उपस्थित होते. फार्मसीबरोबरच इंजिनियरिंग व इतर सायन्स पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी यावेळी संधी उपलब्ध झाल्या.
या कॅम्पस ड्राईव्हमध्ये विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार विविध परीक्षा घेण्यात आल्या, एप्टीट्यूड टेस्ट व ग्रुप डिस्कशनचा समावेश होता. यातून उत्तम गुण प्राप्त करणारे विद्यार्थी हे अंतिम म्हणजे पर्सनल इंटरव्यू या राऊंडला सामोरे गेले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी द्वितीय वर्ष) च्या १० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता व त्यापैकी ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे व तसेच सिरी एज्युटेक तर्फे सचिन कुंभोजे, अंजोरी कुंभोजे आणि अमेय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.3
°
C
28.3
°
28.3
°
79 %
6.7kmh
98 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°