कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा ॲथलीट अभिषेक देवकाते याची जर्मनीत होणाऱ्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स-२०२५’साठी भारतीय संघात निवड झाली आहे. शनिवारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्याला शुभेच्छा देऊन सुयश चिंतले.
नाईट कॉलेज ऑफ कोल्हापूर येथे शिक्षण घेत असलेला आणि शिवाजी विद्यापीठामध्ये सराव करणारा विद्यार्थी खेळाडू अभिषेक देवकाते याची जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये ॲथेलेटिक्समधील दहा हजार मीटरच्या शर्यतीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. काल त्याने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी कुलगुरूंनी त्याचा सत्कार करून स्पर्धेमध्ये भरीव यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, उपकुलसचिव गजानन पळसे, प्रशिक्षक प्रकुल मांगोरे-पाटील, अमोल अळवेकर उपस्थित होते.
——————————————————-
शिवाजी विद्यापीठाच्या अभिषेक देवकाते याची जागतिक स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32
°
C
32
°
29.9
°
40 %
3.1kmh
0 %
Mon
32
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

