Homeसामाजिकपन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे 'सुपर स्वच्छ लीग'मध्ये देशपातळीवर यश

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये देशपातळीवर यश

• दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
कोल्हापूर :
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ च्या ‘सुपर स्वच्छ लीग’ विशेष श्रेणीत पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदने यश मिळविले आहे. पन्हाळा शहराचा दि. १७ जुलै २०२५ रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या  हस्ते गौरव करण्यात आला. हा पुरस्कार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पालिकेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी आणि पाणीपुरवठा अभियंता प्रिया तारळेकर यांनी स्विकारला.
देशांतर्गत स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ चे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात पन्हाळा नगरपरिषदेने सुपर स्वच्छ लीग श्रेणीत पुन्हा एकदा दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
कचरामुक्त आणि हगणदारीमुक्त शहर यांसारख्या विविध घटकांमध्ये पन्हाळा शहराने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पन्हाळ्याने देशात स्वच्छतेचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शहराने केवळ स्वच्छता राखली नाही, तर देशपातळीवर मापदंड बनविला आहे.
सर्व लोकप्रतिनिधी, शहरातील नागरिक, पन्हाळा नगरपरिषद प्रशासन, अधिकारी, कर्मचारी यांचे अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण सहकार्य हे या यशामागील मुख्य कारण आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या यशात समावेश आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून पन्हाळा पालिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
29 ° C
29 °
28.9 °
84 %
3.1kmh
75 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page