कोल्हापूर :
विद्यार्थ्यांमध्ये मानवता धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विवेक वाहिनीचे योगदान मोठे आहे. विवेक वाहिनीच्याव्दारे आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, लिंगभेद, पर्यावरण, संविधान प्रबोधन, नेतृत्व विकास, वैज्ञानिक दृष्टिकोन यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वत:चे व्यक्तिमत्व विकसित करणे आवश्यक आहे. विवेक वाहिनी ही समाजाला प्रगल्भ करणारी चळवळ असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले.
ते विवेकानंद कॉलेजमधील विवेक वाहिनी विभाग, आयक्यूएसी विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेचे उदघाटन अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी विवेक वाहिनी चळवळीतून धगधगते विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे. विविध कल्पना व योजना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी विवेक वाहिनी मदत करीत असते. विवेक वाहिनीच्या माध्यमातून तरुणांनी स्वत:मध्ये विचार करण्याची क्षमता वृध्दिंगत केली पाहिेजे, असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कृष्णात स्वाती यांच्या मार्गदर्शनाखाली गटचर्चा घेण्यात आली. दुसऱ्या सत्रात विभावरी नकाते आणि डॉ. संतोष जेठीथोर यांनी ‘विवेक वाहिनी का व कशी’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थना व रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. प्रास्ताविक अंनिस कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रविण चौगुले यांनी केले. आभार अंनिसचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी मानले तर सूत्रसंचालन रेश्मा खाडे यांनी केले.
कार्यशाळेचे संयोजन डॉ. सरिता शिंदे यांनी केले. या कार्यशाळेस आयक्यूएसी समन्व्यक डॉ. श्रुती जोशी, प्रमोद शिंदे, डॉ. संदीप पाटील, रजिस्ट्रार एस. के. धनवडे आणि विविध महाविद्यालयातील विवेक वाहिनी विभागाचे समन्वयक उपस्थित होते.
विवेक वाहिनी ही समाजाला प्रगल्भ करणारी चळवळ : प्रा. हिर्डेकर
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.3
°
C
28.3
°
28.3
°
79 %
6.7kmh
98 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°