- मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार
कोल्हापूर :
लाखो रूग्णांपर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आणि अत्याधुनिक उपचारांद्वारे आरोग्य सेवक लेखनीय योगदान देणाऱ्या कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी केंदीय मंत्री पटेल यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी ‘नवभारत’चे संचालक वैभव माहेश्वरी, रुबी क्लिनिकचे सीईओ बेहराम खुदाई आदी उपस्थित होते. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या ८व्या ‘हेल्थ केअर समिट’ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.