• उद्योगपती संजय किर्लोस्कर मुख्य अतिथी
• विलास शिंदे, भावित नाईक यांना डॉक्टरेट तर ९१२ विद्यार्थ्यांना पदवी
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचा तिसरा दीक्षांत समारंभ सोमवारी (दि. १९) कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. उद्योगपती किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर्स (डी.लीट.) तर ओंस्ट्रो टेक्नोलॉजी प्रा. लि.चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावित नाईक यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे. तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे सायंकाळी ५ वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील व कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिली. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे उपस्थित होते.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ स्थापना १ जुलै २०२१ रोजी झाली. केवळ चार वर्षाच्या कालावधीत विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यापीठात स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, स्कूल ऑफ मॅनेजमेंट विभागातर्गत सध्या चार हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
दीक्षांत समारंभात एकूण ९१२ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये ११ विद्यार्थ्यांना पीएच. डी. देण्यात येणार असून यावेळी १५ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गुप्ता यांनी यावेळी दिली. विद्यापीठाच्या ७० टक्केहून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. १०० हून अधिक संशोधन असून २४ पेटंट प्राप्त झाली आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
——————————
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
haze
25
°
C
25
°
25
°
69 %
2.1kmh
1 %
Fri
25
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°
Tue
25
°

