कोल्हापूर :
उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) काॅलेजमध्ये प्रिकाॅल लि. पुणे या नामांकित कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले. यामध्ये १५४ विद्यार्थ्यांची निवड झाली.
इंटरव्ह्यूसाठी एनआयटी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध काॅलेजमधील तब्बल १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी १५४ विद्यार्थ्यांची कंपनीने प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून निवड करून नियुक्तीपत्र दिले. त्यांना वार्षिक रुपये २,३०,००० वेतनासह भविष्य निर्वाह निधी, भोजन, बस व आरोग्य सुविधा कंपनीकडून दिल्या जातील.
दुचाकींपासून अवजड वाहनांपर्यंतच्या सर्व वाहनांसाठी चालकास सहाय्यक व इतर नियंत्रण प्रणाली पुरवण्यात प्रिकाॅल कंपनी आघाडीवर आहे. एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी कंपनीचे एचआर मॅनेजर संतोष भोसले यांचे स्वागत केले. यावेळी संतोष भोसले यांनी इंटरव्ह्यूच्या उत्तम आयोजनासाठी एनआयटीचे अभिनंदन केले. यासाठी टिपीओ प्रा. किरण वळीवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————
एनआयटीमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १५४ विद्यार्थ्यांची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
haze
25
°
C
25
°
25
°
69 %
2.1kmh
1 %
Fri
25
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°
Tue
25
°

