Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. झांबरे व डॉ. वाटेगावकर यांच्या संशोधनास युके सरकारचे पेटंट

डॉ. झांबरे व डॉ. वाटेगावकर यांच्या संशोधनास युके सरकारचे पेटंट

कोल्हापूर :
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे व संशोधन व विकास कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाटेगावकर यांनी प्रयोगशाळा व इंडस्ट्रीच्या सांडपाण्यातील पर्यावरणास हानिकारक रंग काढण्यासाठी विकसित केलेल्या शोषण यंत्र निर्मितीच्या नाविन्यपूर्ण व कार्यक्षम पद्धतीला युके सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान लाभले असून, त्यांनी महाविद्यालयाला चौथे आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवून देत जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाईचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले आहे.
याआधीही डॉ. झांबरे व डॉ. वाटेगावकर यांच्या संशोधनास युके, जर्मनी व भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले असून अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणात त्यांना जागतिक शास्त्रज्ञांच्या मान्यवर यादीत स्थान मिळाले आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे म्हणाले की, या उपकरणात डब्ल्यूएफएस-३०० नावाचा सुधारित वाळूवर आधारित शोषक पदार्थ वापरला आहे. हा शोषक पदार्थ फाँड्रीमधील टाकाऊ वाळूपासून बनविला आहे. हा पदार्थ प्रयोगशाळा व इंडस्ट्रीच्या सांडपाण्यातील हानिकारक रंग काढण्यासाठी उपयुक्त आहे. हे यश केवळ वैयक्तिक नसून महाविद्यालय, संस्था व विद्यार्थ्यांच्या संशोधन संस्कृतीचे फलित आहे. पर्यावरणपूरक व समाजोपयोगी संशोधन करण्याची प्रेरणा आम्हाला जनता शिक्षण संस्थेकडून मिळाली आहे.
डॉ. संदीप वाटेगावकर यांनी औद्योगिक कंपन्या व प्रयोगशाळेतील सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आमचे संशोधन उपयुक्त ठरेल व भविष्यात या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक स्तरावर उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, डॉ. झांबरे व डॉ. वाटेगावकर यांच्या संशोधनामुळे महाविद्यालयाची संशोधनातील गुणवत्ता अधोरेखित झाली असून संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला नवी ओळख मिळाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
38 %
2.8kmh
64 %
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page