Homeकला - क्रीडाघोडावत विद्यापीठात एआययू पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा

घोडावत विद्यापीठात एआययू पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा

• स्पर्धेत देशभरातील विद्यापीठांचा सहभाग
कोल्हापूर :
संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या मान्यतेखाली पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धा दि. ७ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत होतील. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश व गोवा या राज्यांतील सरकारी, निमसरकारी व स्वयंवित्त विद्यापीठांमधील सुमारे ६० विद्यापीठांतील ५०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धांचे उदघाटन मंगळवारी (दि. ६) संजय घोडावत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उदघाटन समारंभ होईल. यावेळी विद्यापीठाचे कुलपती संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे तसेच क्रीडा अधिकारी सुर्यजीत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, कोल्हापूर डॉ. बी. धीरज कुमार हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धांमध्ये महिला संघाचे सामने संजय घोडावत विद्यापीठाच्या कॅम्पसमधील टेनिस कोर्टवर, तर पुरुष संघाचे सामने कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी स्पर्धेच्या आयोजनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.5 ° C
24.5 °
24.5 °
52 %
4.8kmh
1 %
Sat
24 °
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °

Most Popular

You cannot copy content of this page