कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळने सम्राटनगर स्पोर्ट्सवर ३-० ने मात करून विजयी हॅटट्रिक साधली. ‘शिवाजी’ने सलग तिसऱ्या विजयासह एकूण ९ गुण प्राप्त केले आहेत.
छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळ विरूध्द सम्राटनगर यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पूर्वार्धात ५व्या मिनिटाला संकेत नितीन साळोखेने संघाचा पहिला गोल फलकावर झळकवला. सम्राटनगरच्या गोलक्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत संकेतने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करून बरोबरी साधण्यासाठी सम्राटनगरकडून मोहित घोरपडे, निरंजन कामते, असिल बागवान, मोहम्मद मकानदार यांनी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना फिनिशिंगअभावी गोल करता आला नाही. ‘शिवाजी’कडून संकेत साळोखे, हर्ष जरग, यश जांभळे, खुर्शीद अली यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही.
पूर्वार्धात मिळालेल्या १-० गोलच्या आघाडीवर ‘शिवाजी’ने आक्रमक चढाया केल्या. त्यामध्ये यश जांभळे व सिध्देश साळोखे यांनी सोप्या संधी गमावल्या. एका चढाईत हर्ष जरगच्या पासवर संकेत नितीन साळोखेने वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल ६४व्या मिनिटास नोंदवून आघाडी २-० अशी भक्कम केली. त्यानंतर ७५व्या मिनिटाला हर्ष जरगने गोल नोंदवून आघाडी ३-० अशी वाढवली. सम्राटनगरच्या यासिन नदाफ, मोहित घोरपडे, असिल बागवान, मोहम्मद मकानदार यांनी खोलवर चाली रचल्या पण ते समन्वयाअभावी गोल करण्यात अपयशी ठरले. मोहित घोरपडेच्या पासवर मोहम्मद मकानदारने गोलची सोपी संधी दवडली. अखेर उर्वरित वेळेत ‘शिवाजी’ने ३-०ची आघाडी कायम राखून सामना जिंकला अन् विजयाची हॅटट्रिक साधली. ——————————
• संध्यामठ – पीटीएम (ब) : दु.१:३० वा.
• पीटीएम (अ) – दिलबहार : दु. ४ वाजता
‘शिवाजी’ची विजयी हॅटट्रिक
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
24.9
°
28 %
2.6kmh
3 %
Sat
27
°
Sun
26
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

