Homeकला - क्रीडावेताळमाळची जुना बुधवारवर मात

वेताळमाळची जुना बुधवारवर मात

• उत्तरेश्वर टायब्रेकरवर विजयी 
कोल्हापूर :
पिछाडीवरून आघाडी घेत वेताळमाळ तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर ४ विरुध्द १ गोलने मात करून तीन गुण प्राप्त केले. तसेच उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर टायब्रेकरवर विजय मिळवला. दोन्ही तुल्यबळ संघातील सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची लक्षणीय उपस्थिती होती.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. सोमवारी वेताळमाळ आणि जुना बुधवार संघातील सामना चुरशीचा झाला. रविराज भोसलेने चौथ्या मिनिटाला गोल नोंदवून जुना बुधवारला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. पण ही आघाडी फारवेळ टिकली नाही. एका चढाईत शोएब बागवानने गोलक्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. या गोलव्दारे वेताळमाळने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सर्वेश वाडकरच्या पासवर लायटॉनजाम मिताईने गोल करून १७व्या मिनिटास संघाला २-१ ने आघाडीवर नेले. जुना बुधवारकडून बरोबरी साधण्यासाठी तर वेताळमाळकडून आघाडी वाढवण्यासाठी जोरदार चढाया झाल्या पण कोणालाही यश मिळाले नाही.
उत्तरार्धात दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. जुना बुधवारच्या रविराज भोसले, नॉनगन्बा सिंग, प्रथमेश जाधव, सुशील सावंत, शुभम जाधव यांनी तर वेताळमाळच्या सर्वेश वाडकर, आकाश मोरे, मिताई, शोएब बागवान, प्रणव कणसे यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या. सर्वेश वाडकरच्या हेडव्दारा दोनदा संधी वाया गेली. बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या आकाश माळीने वेगवान चाली रचल्या. त्याने मारलेल्या एका फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली. ८० व्या मिनिटाला मिताईने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल फलकावर झळकवला. त्यानंतर जादावेळेत आकाश माळीने गोल नोंदवून आघाडी ४-१ अशी भक्कम केली. अखेर याच गोलफरकावर वेताळमाळने पहिला विजय साकारताना तीन गुणांची कमाई केली.
उत्तरेश्वर टायब्रेकरवर विजयी…
दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर आणि प्रॅक्टीस क्लब यांच्यातील सामना पूर्णवेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला. सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आली. त्यामध्ये उत्तरेश्वरकडून प्रतिक कांबळे, श्रीकांत माने, तुषार पुनाळकर, अजिंक्य कदम, अझर मोमीन यांनी अचूक गोल नोंदविले. प्रॅक्टीस क्लबच्या सचिन गायकवाड, केवल कांबळे, थरूण रेड्डी, ओम पवार यांनी अचूक गोल केले. त्यांच्या सूरज जाधवचा फटका वाया गेला. अशाप्रकारे उत्तरेश्वरने ५ विरूध्द ४ गोलने सामना जिंकला.
——————————————————-
बुधवारचे सामने…
• संध्यामठ – प्रॅक्टीस क्लब : दु. १:३० वा.
• पीटीएम (अ) – वेताळमाळ : दु. ४ वाजता
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
50 %
2.1kmh
0 %
Mon
26 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page