Homeकला - क्रीडासय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग आणि अंतिम सामन्यांचे पुण्यात आयोजन

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग आणि अंतिम सामन्यांचे पुण्यात आयोजन

• १२ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार सामने
कोल्हापूर :
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ मधील सुपर लीग टप्पा आणि अंतिम सामना आता पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. बीसीसीआयने इंदोर येथे मोठ्या परिषदेच्या कारणास्तव हॉटेल उपलब्धतेच्या अडचणीमुळे हे सामने पुण्यात हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताच्या अग्रगण्य घरगुती टी-२० स्पर्धेतील निर्णायक सामने १२ ते १८ डिसेंबर दरम्यान पार पडतील. सुपर लीग सामने एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे आणि डी. वाय. पाटील अकॅडमी ग्राऊंड येथे खेळवले जातील. १८ डिसेंबर रोजी अंतिम सामना एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे स्पर्धेच्या महत्त्वाच्या टप्प्यातील सामने पुन्हा पुण्यात येणार असून देशातील सर्वोत्तम खेळाडू चाहत्यांसमोर आपली कर्तृत्व सिद्ध करतील.
याप्रसंगी एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे की, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग आणि अंतिम सामन्यांचे आयोजन करण्याची जबाबदारी देऊन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर विश्वास दाखविल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे मनःपूर्वक आभार मानतो. एमसीए पूर्णपणे सज्ज असून खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. पुण्यात होणाऱ्या या रोमांचक आणि स्पर्धात्मक सामन्यांची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.
एमसीएने स्पर्धेचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी लागणाऱ्या सर्व तयारीला सुरुवात केली आहे आणि बीसीसीआयच्या दर्जानुसार उच्च दर्जाची व्यवस्था सुनिश्चित केली जात आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
50 %
2.1kmh
0 %
Mon
26 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page