कोल्हापूर :
राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हास्तरीय रेशीमगाठी वधू-वर व समाज मेळावा माजी सामाजिक कल्याण मंत्री व महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे रविवारी (दि.१४) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दिपक खांडेकर व जिल्हा कार्याध्यक्ष संतोष बिसुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, या मेळाव्यास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातून वधू वर उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, व्यावसायिक, पदवीधर, शिक्षक, इंजिनिअर, डॉक्टर, वकील तथा घटस्फोटीत विधवा, विदुर, बिजवर यांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.
याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ नागरिकांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक व उद्योजक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नवीन पदाधिकारी यांची नियुक्तीपत्रे वाटप व समाज प्रबोधन असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
या पत्रकार परिषदेला अर्जुन धुमाळे, संजय जाधव, अमित चव्हाण, सौ. सुनिता कांबरे,सौ. आरती कामटे आदी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी दिपक खांडेकर (मो. नं. ९८२३६५५४५४) आणि संतोष बिसुरे (मो. नं. ९३२०००९४८६) यांच्याशी संपर्क साधावा.
राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे रविवारी वधू-वर व समाज मेळावा
Mumbai
smoke
32
°
C
32
°
29.9
°
40 %
3.1kmh
0 %
Mon
32
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

