कोल्हापूर :
येथील विवेकानंद महाविद्यालयात आज संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संविधानाच्या प्रस्तावनाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या देशाचे संविधान स्वीकृत करण्यात आले होते. संविधान हा देशाचा मुळ कायदा असतो. त्याचे रक्षण करणे नागरिकांची जबाबदारी आहे. देशामध्ये स्वातंत्र्य, समता व बंधूता जोपासणे संविधानामुळे शक्य झाले आहे. यामुळेच सर्व समाजाची प्रगती साधता येते, असे मत प्रा. समिक्षा फराकटे यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व संविधान वाचन प्रा. अवधूत टिपुगडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे, ज्युनिअर, सिनिअर कॉलेजमधील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
——————————————————-
विवेकानंद कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
65 %
1.5kmh
0 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°

