कोल्हापूर :
येथील विबग्योर हाय येथे बालदिनानिमित्त ८व्या स्कुल सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (एससीआयएफएफ) चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात कथाकथन, सर्जनशीलता आणि चित्रपटांद्वारे शिकण्याचा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रख्यात मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते-निर्माते आनंद काळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला, त्यांच्या कलात्मक प्रवासातील अनुभव सांगितले.
उदघाटन समारंभात विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या मालिकेतील पहिल्या स्क्रीनिंगचा समावेश होता. एलएक्सएल फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात २५ देशांमधील १०० हून अधिक बालचित्रपटांच्या विचारपूर्वक निवडीद्वारे तरुण प्रतिभा आणि जागतिक कथाकथनाचा (ग्लोबल स्टोरीटेलिंग) उत्सव साजरा केला जातो.
यावर्षीच्या महोत्सवात विविध शैलींचे प्रदर्शन करण्यात आले. ज्यामध्ये ॲनिमेशन, लाईव्ह-अॅक्शन आणि डॉक्युमेंटरी चित्रपटांचा समावेश होता, तसेच स्कूल सिनेमा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटांचा समावेश होता.
स्क्रीनिंगचे चार वयोगटात वर्गीकरण करण्यात आले होते. यामध्ये ७ वर्षाखालील, ७+, १०+ आणि १३+ वर्षे, जेणेकरून प्रत्येक मूल त्यांच्या शिक्षणाच्या टप्प्याशी संबंधित कथांशी जोडले जाईल याची खात्री होईल. इयत्ता ५ वी पर्यंतचे चित्रपट इंग्रजी किंवा नॉनवर्बल स्वरूपात सादर करण्यात आले. तर इयत्ता ६वी नंतरचे चित्रपट त्यांच्या मूळ भाषांमध्ये इंग्रजी उपशीर्षकांसह प्रदर्शित करण्यात आले.
विबग्योर कोल्हापूरमध्ये ८वा शालेय चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सव उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.6kmh
0 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

