Homeकला - क्रीडाकविन केंगनाळकरने जिंकले पॅरा-शूटिंगमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय पदक

कविन केंगनाळकरने जिंकले पॅरा-शूटिंगमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय पदक

कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील इयत्ता ११वीचा प्रतिभावान पॅरा-शूटर कविन  केंगनाळकर याने १० मीटर एअर रायफल पॅरा-शूटिंगमध्ये सांघिक गटात पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकले.
ही प्रतिष्ठित स्पर्धा अल ऐन, यूएई येथे आयोजित करण्यात आली होती. जिथे ३९ देश २९० नेमबाजानी सहभाग घेतला होता. कविन केंगनाळकरच्या अपवादात्मक कौशल्य आणि समर्पणामुळे त्याला व्यासपीठावर योग्य स्थान मिळाले आहे. कोल्हापूर आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.
कविन केंगनाळकरला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले तसेच मुख्य प्रशिक्षक जीवन राय आणि पॅरालिम्पिक असोसिएशनचे संचालक जयप्रकाश नौटियाल यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27 ° C
27 °
24.9 °
28 %
2.6kmh
3 %
Sat
27 °
Sun
26 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page