Homeशैक्षणिक - उद्योग महावितरणचे कागल एमआयडीसीत नवीन उपकेंद्र

महावितरणचे कागल एमआयडीसीत नवीन उपकेंद्र

कोल्हापूर :
महावितरणकडून ‘कागल एमआयडीसी’मधील डी ब्लॉक येथे नविन ३३/११ केव्ही उपकेंद्र सोमवारी (दि.१५) रोजी मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. या उपकेंद्रामुळे ‘कागल एमआयडीसी’तील औद्योगिक ग्राहकांना अधिक दर्जेदार व जलद गतीने सेवा मिळणार आहे. या उपकेंद्रांमुळे सध्या सुरु असणाऱ्या उद्योगांना वाढीव वीज भार देणे शक्य होणार आहे तर येणाऱ्या नवीन उद्योगांना त्यांच्या मागणीनुसार तात्काळ वीज जोडणी देता येणार आहे.
उपकेंद्र कार्यान्वय प्रसंगी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कागल- हातकणंगलेचे अध्यक्ष मोहन कुशिरे, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, खजानीस अमृतराव यादव, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कोल्हापूर ग्रामीण-२ विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, एमआयडीसी विभागाचे अभियंता जी.व्ही. पाथरवट व कागल उपविभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कागल डी ब्लॉक येथील नविन ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम ‘आरडीएसएस’ या महत्वाकांक्षी योजनेतून पूर्ण करण्यात आले आहे. येथे १० एमव्हीएचे दोन रोहित्रे बसवण्यात आली आहेत. या उपकेंद्रातून ११ केव्हीच्या एकूण चार वीज वाहिन्या निघणार आहेत. या उपकेंद्रातून तत्वतः मान्यता घेऊन सध्या प्रलंबित असणाऱ्या अनेक लघुदाब व उच्चदाब उद्योगांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नवीन उपकेंद्रामुळे हुपरी, मायनर व सांगाव उपकेंद्रातून येणाऱ्या तीन वाहिन्यांवरील विद्युत भार ही कमी झाला आहे.
उपकेंद्र उभारणीकरिता महावितरण एसओपीमध्ये १२ महिन्यांचा कालवधी दिलेला असताना भारत इलेक्ट्रिकल या कंत्राटदार संस्थेने तीन महिन्यांच्या रेकोर्ड ब्रेक वेळेत हे काम सर्व निकष पूर्ण करत अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केले आहे. या ठिकाणी यापूर्वी उपलब्ध क्षमतेपेक्षा अधिक भार आल्यामुळे वारंवार कमी दाबाचा पुरवठा, नवीन औद्योगिक ग्राहकांना जोडणी देताना अडचण, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात तक्रारी व उत्पादनात अडथळे या समस्या उद्भवत होत्या. महावितरणच्या या उपकेंद्रामुळे आता उद्योगांना गती मिळणार असल्याने औद्योगिक संघटना व संबंधित ग्राहक यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
27.9 °
83 %
2.6kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page