Homeकला - क्रीडा'कुर्ला टू वेंगुर्ला' हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून सर्वत्र

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून सर्वत्र

कोल्हापूर :
माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून पाहता येणार आहे.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे. विजय कलमकर दिग्दर्शित हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
सध्या राज्यभरातील ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा- आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. गंभीर विषयाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने हाताळणी या चित्रपटात करण्यात आली आहे.
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि एम.व्ही. शरतचंद्र यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केले आहे.
या चित्रपटात अभिनेते वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी स्टारकास्ट आहे. यासोबतच अमेय परब, शेखर बेटकर आणि अनघा राणे या नवोदित कलाकारांचा अभिनयही आपल्याला पाहायला मिळणार आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
27.9 °
83 %
2.6kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page