कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथे प्रथम वर्ष बी.टेक. व एम.बी.ए. अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन त्यांचे उत्तम भविष्य घडविण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस डॉ. एस. आर. पावसकर यांनी केले.
डॉ. पावसकर म्हणाले, मागील १४ वर्षांत कॅम्पसचे विद्यार्थी सातत्याने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आहेत. स्वायत्त दर्जा प्राप्त महाविद्यालयाला नॅककडून ‘ए’ मानांकन प्राप्त आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक शाखेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिपने सन्मानित केले जाते.
अकॅडमिक डीन प्रा. आर. एस. पवार यांनी विविध उपक्रम व सुविधा यांची माहिती दिली. रिसर्च अँड डेव्हलपमेंटबाबत प्रा. आरिफ शेख, राष्ट्रीय सेवा योजना विषयावर प्रा. केदार रेडेकर तर परीक्षा कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मंदार खटावकर यांनी सविस्तर मांडणी केली. एम.बी.ए. विभागप्रमुख डॉ. गुणाली दिवाण यांनी अभ्यासक्रम, गुणपद्धती, वर्कशॉप, उद्योगभेटी इत्यादींची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राधा पवार यांनी केले तर प्रा. रवी सातपुते यांनी आभार मानले. यावेळी प्रथम वर्ष समन्वयक डॉ. विशाल सूर्यवंशी, डॉ. हमीद नायकवडी, प्रा. शोयब तांबोळी, प्रा. राजेंद्र पंडितराव ,प्रा. संजय इंगवले, प्रा. चैतन्य शहा, प्रा. प्राजक्ता तिनईकर यांच्यासह विभाग प्रमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————-
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे प्रथमवर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
RELATED ARTICLES
Mumbai
mist
29
°
C
29
°
28.9
°
84 %
3.1kmh
75 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°