Homeकला - क्रीडाभारताच्या सी लालरामसांगा व तारिणी सुरी, वंश देव व श्रावणी वाळेकर अंतिम...

भारताच्या सी लालरामसांगा व तारिणी सुरी, वंश देव व श्रावणी वाळेकर अंतिम फेरीत

कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात जपानच्या युझुनो वातानाबे, युरीका नागाफुची यांनी तर, पुरुष गटात काझुमा कावानो, ह्युगा टाकानो यांन अंतिम फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत भारताच्या सी लालरामसांगा व तारिणी सुरी, वंश देव व श्रावणी वाळेकर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत महिला गटात जपानच्या युझुनो वातानाबे हिने काल मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देणाऱ्या भारताच्या दिक्षा सुधाकरचा २१-१५, २१-१९ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत जपानच्या दहाव्या मानांकित युरीका नागाफुचीने भारताच्या दियंका वाल्डियाचा २२-२०, १७-२१, २१-०९ असा संघर्षपूर्ण पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
पुरुष गटात उपांत्य फेरीत नवव्या मानांकित जपानच्या काझुमा कावानोने चौदाव्या मानांकित तैपेईच्या चुंग हसियान यिहचा २१-१३, २१-१५ असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. अवघ्या ३३ मिनिटात काझुमाने चुंगचे आव्हान मोडीत काढले. दुसऱ्या लढतीत जपानच्या दुसऱ्या मानांकित ह्युगा टाकानो याने भारताच्या चौथ्या मानांकित सूर्याक्ष रावतचा २१-१९, २१-१७ असा पराभव करून आगेकूच केली.
मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या सी लालरामसांगा व तारिणी सुरी या जोडीने जपानच्या तिसऱ्या मानांकित शुजी सावदा व एओई बन्नो यांचा १९-२१, २१-१२, २१-१३ असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात भारताच्या वंश देव व श्रावणी वाळेकर यांनी बोर्निल आकाश चांगमाई व झेनिथ अबीगेल यांचा १६-२१, २१-१३, २१-१९ असा पराभव केला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.7 ° C
26.7 °
26.7 °
84 %
5.6kmh
89 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page