Homeशैक्षणिक - उद्योग श्री दत्त साखर कारखान्याच्यावतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान

श्री दत्त साखर कारखान्याच्यावतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान

कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्यावतीने अपघाती विमा चेक प्रदान करण्यात आला. विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांचेकडून पॉलिसी अंतर्गत अपघाती मयत झालेले श्री दत्त साखर कारखान्याचे कर्मचारी राजेंद्र आप्पाराव शहापूरे यांचे वारस श्रीमती राणी राजेंद्र शहापूरे यांना ७.५० लाख रुपये  पॉलिसी चेक प्रदान करण्यात आला.
श्री दत्त कामगार पतसंस्थेकडून ३ लाख रुपये तर श्री दत्त कारखान्याकडून ४ लाख ५० हजार रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला. आजअखेर मयत सभासदांच्या वारसांना एकूण १०१ सभासदांना आत्तापर्यंत १ कोटी २ लाख इतकी आर्थिक मदत देण्यात आली.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते.
चेक प्रदान कार्यक्रम उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, विमा प्रतिनिधी एकनाथ पाटील, कामगार युनियनचे अध्यक्ष बाळू उर्फ प्रदीप बनगे व संचालकांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी कामगार पतसंस्था चेअरमन सुधाकर शहापूरे, व्हॉइस चेअरमन संजय कांबळे, संचालक अनिल सुतार, सेक्रेटरी महेश परीट, युनिअन सेक्रेटरी अरुण पाटील, दिलीप पाटील कोथळीकर, शिवमूर्ती देशिंगे, नितीन लोकरे, परवेज मेस्त्री, हेड टाइम किपर राजेंद्र केरिपाळे, एच. आर. मॅनेजर जयदीप देसाई आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.7 ° C
27.7 °
27.7 °
79 %
4.2kmh
88 %
Sun
28 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page