Homeकला - क्रीडातन्मयी, चतुर्थी, मायशा, सिद्धांत, रुहान, विवान व कुशाग्र यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

तन्मयी, चतुर्थी, मायशा, सिद्धांत, रुहान, विवान व कुशाग्र यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

• महाराष्ट्र राज्य १३ वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर :
ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम पुरस्कृत महाराष्ट्र राज्य १३ वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेमधून तन्मयी, चतुर्थी, मायशा, सिद्धांत, रुहान, विवान व कुशाग्र यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्वांची गोवा येथे ३ ते ९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या १३ वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.                                                        
ॲड. पी. आर. मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य १३ वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर मुलांच्या गटात चौथा मानांकित पुण्याचा सिद्धांत साळुंकेने आठ पैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले. दहावा मानांकित मुंबईचा रुहान माथुरने सात गुणासह उपविजेतेपद संपादन केले. सातवा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनीने साडेसहा गुणासह तृतीय क्रमांक पटकाविला तर आठवा मानांकित नागपूरच्या कुशाग्र पालीवालने चौथे स्थान स्थान मिळविले.
मुलींच्या गटात चौदावी मानांकित सातारची तन्मयी घाटेने सात गुण मिळवून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. दहावी मानांकित पुण्याची चतुर्थी परदेशीने साडेसहा गुणासह उपविजेतेपद मिळविले तर अग्रमानांकित मुंबईच्या मायशा परवेजला साडेसहा गुण मिळवून ही कमी टायब्रेक गुणामुळे तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.                        
मुख्य बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे- मुलांचा गट ५) शौनक बडोले नागपूर, ६) आदित्य कदम मुंबई, ७) श्लोक माळी पुणे, ८) सहेजवीर सिंग मारस नागपूर, ९) शाश्वत गुप्ता पुणे, १०) आराध्य पार्टे ठाणे.                                                 मुलींचा गट – ४) प्रिशा घोलप रायगड, ५) सान्वी गोरे सोलापूर, ६) परिधी गांधी बुलढाणा, ७) भूमिका वागळे छत्रपती संभाजीनगर, ८) कार्तिकी ठाकूर मुंबई, ९) जैना नावोले अमरावती, १०) ईश्वरी नाईक नाशिक.
  उत्तेजनार्थ बक्षीसे-                      
७ वर्षाखालील उत्कृष्ट मुले – १) रिधान कारवा कोल्हापूर, २) हर्ष कांबळे कोल्हापूर, ३) अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर. मुली- १) प्रितिका नंदी.                                                                  ९ वर्षाखालील उत्कृष्ट मुले – १) ईशान मदवारे पुणे, २) अन्वित गायकवाड अहिल्यानगर, ३) अवनीश जितकर कोल्हापूर, मुली – १) आदिना मोहाती पुणे, २) रीवा चरणकर सातारा, ३) पृथा ठोंबरे सोलापूर.                      
११ वर्षाखालील उत्कृष्ट मुले- १) राघव पावडे पुणे, २) वरद पाटील सांगली, ३) आराध्य ठाकूर देसाई कोल्हापूर. मुली – १) देवांशी गावंडे छत्रपती संभाजीनगर, २) माधवी देशपांडे सांगली, ३) हर्षदा पाटील कोल्हापूर.
श्री महालक्ष्मी बॅंकेचे अध्यक्ष ॲड. रवी शिराळकर, क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूरचे खजिनदार आनंद माने, कॅप्टन उत्तम पाटील, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, शाहू मॅरेथॉनचे किसनबापू भोसले, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, महालक्ष्मी बँकेचे संचालक कृष्णा काशीद, राजन देशपांडे, श्रीकांत लिमये व संतोष कडोलीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आला.
यावेळी चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले मनीष मारुलकर, धीरज वैद्य उत्कर्ष लोमटे, प्रीतम घोडके, अनिश गांधी व आरती मोदी उपस्थित होते. विजय माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर उपस्थित होत्या. त्यांना मनिष मारुलकर, करण परीट,आरती मोदी, रोहित पोळ, रवींद्र निकम, प्रशांत पिसे यांनी सहाय्य केले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.9 ° C
26.9 °
26.9 °
84 %
4.2kmh
99 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page