• डाटा सायन्स विभागाचा बजरंग धामणेकर प्रथम
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तब्बल १५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये डाटा सायन्स विभागाचा बजरंग धामणेकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
डेटा सायन्स विभागाच्या बजरंग धामणेकर याने प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. याच विभागाच्या प्रियांका पाटील, अनिकेत माळी, अनुजा पाटील, वेदांत नाईक, सिद्धेश आग्रे, शिवानी देसाई, ऋतुजा पाटील, स्नेहल आळवेकर आणि आशुतोष जरग त्यांनी अनुक्रमे दुसरा ते दहावा क्रमांक मिळवला आहे.
कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या प्रसाद चौगुले (सहावा), साक्षी जाधव (दहावा), सिव्हिल विभागाच्या शिवप्रसाद खोत (नववा), शरद टिपुगडे (दहावा) तर तर इलेक्ट्रिकल विभागाच्या सलमान खोत (दहावा) यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत ‘टॉप १०’ मध्ये स्थान मिळवले आहे.
डी. वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त देवश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, गेल्या वर्षीच महाविद्यालयाला नॅक मानांकन मिळाले असून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे महाविद्यालयाची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. डाटा सायन्स १०, कॉम्प्युटर सायन्स २ , इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग २ विद्यार्थी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यांचे हे यश कौतुकास्पद आहे.
या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कॅम्पस संचालक डॉ. अभिजित माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
——————————————————-
डी.वाय’ अभियांत्रिकी साळोखेनगरचे १५ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
24.9
°
28 %
2.6kmh
3 %
Sat
27
°
Sun
26
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

