कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग व कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभाग यांच्या सहकार्याने कागल – विवेकानंद कॉलेज – कागल या मार्गावर बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
या बससेवेचे उदघाटन श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते व कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभाग उपायुक्त परितोष कंकाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी वाहतूक निरीक्षक नितीन पवार, महाविद्यालयाच्या आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. श्रुती जोशी, अपघात प्रमुख संतोष शिंगारे, वाहक ए. व्ही. सातपूते व चालक पी. डी. सातपूते हे उपस्थित होते.
याप्रसंगी कौस्तुभ गावडे यांनी, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वाहतुकीची सोय असणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन संस्था, विवेकानंद कॉलेज आणि प्रा. डॉ. सिध्दार्थ घोडेराव यांनी या बससेवेसाठी पाठपुरावा करुन ही बससेवा मंजूर करुन आणली आहे. बससेवा ही कागल, उजळाईवाडी, उचगाव, कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, अजिंक्यतारा चौक, विवेकानंद कॉलेज, शुगरमिल मार्गे रंकाळा असा मार्गक्रमण करणार आहे. या भागातील विद्यार्थ्यांनी या बससेवेचा लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे, असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले. आभार प्रा. डॉ. सिध्दार्थ घोडेराव यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
——————————————————-
कागल – विवेकानंद कॉलेज – कागल बससेवेचा शुभारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1
°
C
27.1
°
27.1
°
84 %
4.2kmh
96 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°