Homeशैक्षणिक - उद्योग ‘डी. वाय. पी. इंजिनिअरिंग साळोखेनगर’ला सर्वाधिक पसंती

‘डी. वाय. पी. इंजिनिअरिंग साळोखेनगर’ला सर्वाधिक पसंती

• प्रथम वर्ष अभियांत्रिकी पहिल्या प्रवेश फेरीची यादी जाहीर
कोल्हापूर :
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये  डी. वाय. पी. साळोखेनगर अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या प्रवेश फेरीची यादी जाहीर झाली. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अस्वायत्त (Non-Autonomous) अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये डी. वाय. पी. साळोखेनगर महाविद्यालयाने सर्वाधिक प्रवेश मिळवत आघाडी घेतली आहे.
यावेळी कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले की, २०१४ साली महाविद्यालयाची सुरुवात झाली असून संस्थेला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेकडून (NAAC) पाच वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यामध्ये १३ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्ससह सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल शाखांना देखील यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
प्रवेश प्रक्रियेतील यशाबरोबरच गुणवत्ताधारित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात दाखल होण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. स्वप्नील पाटील (९४%) – सिव्हिल इंजिनिअरिंग आणि ऋतिका खामकर (९१%) – कॉम्प्युटर इंजिनिअरिंग यांसारख्या गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांनी डी. वाय. पी. साळोखेनगर महाविद्यालयाची निवड करून संस्थेवरील विश्वास अधोरेखित केला आहे. त्यामुळे गुणवत्तेची परंपरा अधिक बळकट होत आहे.
प्राचार्य डॉ. सुरेश माने म्हणाले, गेल्या दशकभरात गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यावसायिक ज्ञानावर आधारित प्रात्यक्षिकांवर भर आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन या घटकांमुळे आम्ही सातत्य राखले आहे. त्यामुळेच डी. वाय. पी. इंजिनिअरिंग कॉलेज, साळोखेनगर हे विद्यार्थ्यांसाठी एक विश्वासार्ह व उत्कृष्ट पर्याय ठरले आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व तेजस पाटील यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत अभिनंदन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, प्रवेश प्रक्रिया प्रमुख ओमकार चंदगडकर, सर्व प्रवेश समन्वयक, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
50 %
2.1kmh
0 %
Thu
26 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page