Homeकला - क्रीडाविवेकानंद महाविद्यालयाच्या अनिष सोनटक्केला टेबल टेनिस स्पर्धत सुवर्णपदक

विवेकानंद महाविद्यालयाच्या अनिष सोनटक्केला टेबल टेनिस स्पर्धत सुवर्णपदक

कोल्हापूर :
सांगली येथे झालेल्या दुसऱ्या स्टेट रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरमधील बी.कॉम भाग ३ मध्ये शिकत असलेला विद्यार्थी अनिष सतिश सोनटक्के याने ओपन सिंगल टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंतचा तो पहिला खेळाडू ठरला ज्याने राज्य स्तरावर टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली.
अनिष सोनटक्के या खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
27.9 °
83 %
5.1kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page