• ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती यांची ग्वाही
कोल्हापूर :
सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमातासाठी संपर्क अभियान आयोजित केले असून या उपक्रमातून माजी सैनिकांच्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही रेकॉर्ड्स आणि कमांडंट, रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर विशिष्ट सेवा पदक, अधिकारी ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती यांनी दिली.
महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता यांच्यासाठी संपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त), रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनिअर ग्रुप, खडकीचे कर्नल मुळचंद गुजर, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी सुभाष बाबू डोंगरे, लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील, मेजर ज्ञानेश्वर मोरे रेकॉर्ड ऑफिस बीईजी तर्फे उपस्थित होते.
ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती म्हणाले, आपण सर्वांनी देशासाठी सेवा दिली आहे. आपल्या सेवा काळात विविध अडचणींना सामोरे गेला आहात. आपल्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. आपण सर्वांनी देशसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले. देशाप्रती कार्य, आपण दिलेले योगदान हे बहुमुल्य आहेत. त्याची ही परतफेड करण्यासाठी या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली असून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या या उपक्रमांतून नक्कीच पूर्ण करु. तसेच स्पर्श पोर्टलच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या सादर कराव्यात त्याही आम्ही पूर्ण करु.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ.भीमसेन चवदार यांनीही जिल्हा सैनिक मंडळाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. पुढील मेळावा हा डिसेंबर महिन्यात घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनिअर ग्रुप, खडकीचे कर्नल मुळचंद गुजर यांनी सैनिकांच्या पेन्शनबाबत माहिती दिली. या कार्यक्रमांची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शहीद अग्निवीर सूरज पाटील यांच्या वडीलांना १ लाख रुपयांचा धनादेश वितरण केला तसेच शहीद लक्ष्मण ओवूळकर यांच्या पत्नी श्रीमती शोभा ओवूळकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा,वीर पत्नी, वीरमाता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी सैनिकांच्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु
Mumbai
mist
28
°
C
28
°
27.9
°
83 %
5.1kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°