कोल्हापूर :
आजच्या युगात कंपनी सेक्रेटरी हे करिअरसाठी एक उत्तम क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या मेहनतीने अभ्यास केला आणि परीक्षा पास झाल्या तर चांगल्या कंपनीमध्ये उच्च दर्जाच्या नोकरीच्या संधी मिळतील, असे मत सी.एस. व आय.सी.एस.आय. कोल्हापूर विभाग चेअरमन जयदीप पाटील यांनी व्यक्त केले. ते विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्यावतीने आयोजित कंपनी सेक्रेटरी करिअर व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
कला, वाणिज्य, विज्ञान या कोणत्याही शाखेतील विद्यार्थी कंपनी सेक्रेटरी पदवी प्राप्त करु शकतो. कायदेशीर सल्लागार, मानव संसाधन प्रबंधक, व्यवसाय अनुपालन नियंत्रण, संतुलन ठेवण्याचे काम आणि कौशल्य उत्कृष्ठ कंपनी सेक्रेटरीचे आहे. आजच्या कार्पोरेट जगामध्ये प्रशासक म्हणून त्याची भूमिका महत्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी कंपनी सेक्रेटरी क्षेत्रात करिअर करावे, असे मत प्रसिध्द कंपनी सेक्रेटरी सचिन बीडकर यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांनी कंपनी सेक्रेटरी परीक्षा देऊन आपले भावी आयुष्य उज्वल करावे. आजच्या वाढत्या लोकसंख्येमुळे व नोकरीतील स्पर्धांमुळे नोकरी मिळविणे कठीण झाले आहे. मात्र विद्यार्थ्यांना मेहनतीने यश मिळू शकते. हे विवेकानंदच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी सी.एस. व सी.ए. परीक्षेत सिध्द करुन दाखवलेले आहे. कंपनी सेक्रेटरी हा कंपनीचा महत्वाचा अधिकारी असल्याने संचालक मंडळासाठी मुख्य सल्लागार असतो. हे करिअर सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे आहे.
प्रास्ताविक प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी केले. स्वागत प्रा. सौ. एस. एन. ढगे यांनी केले. प्रा. सौ. एस. पी. वेदांते व प्रा. अश्विनी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एस. कोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
कंपनी सेक्रेटरी हा करिअरसाठी राजमार्ग : जयदीप पाटील
RELATED ARTICLES
Mumbai
mist
28
°
C
28
°
28
°
83 %
3.1kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°