Homeशैक्षणिक - उद्योग गोकुळच्या ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

गोकुळच्या ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍यावतीने संघाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गोकुळचे चेअरमन नविन मुश्रीफ म्हणाले की, गोकुळच्या प्रगतीसाठी कर्मचारी यांनी आपल्या संघ सेवेतून मोलाचे योगदान दिलं आहे. आपल्या अनुभवातून वेळोवेळी संघाचे नुकसान टाळले आणि कठीणप्रसंगी योग्य दिशा दाखवली. त्यांची शिस्त, सचोटी आणि संघाशी असलेली नाळ ही सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरही गोकुळशी असलेलं नातं तुटत नाही, उलट ते अधिक भावनिक आणि बंधुत्वाचं होतं. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या गावात, कुटुंबात किंवा वैयक्तिक पातळीवर दुग्ध व्यवसायाशी नातं टिकवून ठेवावं. गोकुळशी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संपर्कात राहणं ही केवळ निष्ठा नव्हे, तर संस्थेच्या वाटचालीत आपलं योगदान सतत जपण्याचा एक मार्ग आहे.
दरम्यान, किर्गीस्थान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल कुस्तीपटू प्रथमेश सुर्यकांत पाटील (रा. बानगे ता. कागल) तसेच नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक व किर्गीस्थान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत निवड झालेबद्दल हर्षवर्धन अजित माळी (रा. म्हाकवे ता. कागल) यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्‍ये माणिक डवरी, सर्जेराव पाटील, रामचंद्र चव्हाण, कोंडीबा पाटील, रंगराव चौगुले, रघुनाथ चौगुले, आनंदा स्वामी, सातापा पारळे, आकाराम पाटील, संभाजी पाटील, सुखदेव सुळकुडे, राजाराम पाटील, चंद्रशेखर घाळी, गजानन मुचंडी, जयवंत पाटील, भागोजी दळवी, अशोक परीट, बाजीराव कणसे त्याचबरोबर इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना श्रीफळ, गोकुळचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी माजी चेअरमन व संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी तसेच सेवानिवृत्‍त कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
27.9 °
83 %
5.1kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page