कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूट आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परीक्षा २०२५मध्ये इन्स्टिट्यूटचा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चंकित निकाल लागला आहे. इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा एकूण १३ विषयांचा निकाल १००% लागला असून, हे यश सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे.
या परीक्षेमध्ये सर्व विभागांमधून मिळून एकूण ४५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले. विशेष म्हणजे ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण वेगवेगळ्या विषयांमध्ये मिळवले. ४३६ विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मार्क्स मिळाले. २८८ विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळाला आहे.
तृतीय वर्ष- सर्व विभागातून गुणवान विद्यार्थी सावजी सिद्धी श्रीनिवास ९८.१२%,
बरगाले आदित्य संजय ९६.५९%, मनाडे निर्झरा अनिल ९५.८८% . द्वितीय वर्ष- पाटील मनाली राजेंद्र ९३.८८%, खोराटे ऐश्वर्या सुर्यकांत ९१.०६., नेवगे श्रावणी मधुकर ९०.५९% .प्रथम वर्ष सर्व विभाग- पवार ईशान चेतन ९४.००%, जाधव श्रेया जयवंत ९३.०६%, पटेल कुणाल वसंत ९२.२२%. अशी माहिती पॉलिटेक्निक अकॅडमिक डीन प्रा. रवींद्र धोंगडी यांनी दिली आहे.
संचालक डॉ. विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहिल अशी आशा व्यक्त करून या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विभागप्रमुख यांना देऊन सर्वांचे मनापासून कौतुक केले.
घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उन्हाळी परीक्षेचा सर्व विभागांचा उच्चांकित निकाल
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.6
°
C
27.6
°
27.6
°
83 %
9.9kmh
100 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°