राजर्षी शाहू पुरस्कार डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
कोल्हापूर :
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दिला जाणारा सन २०२५ चा राजर्षी शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उप पोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज जयंतीदिनी म्हणजेच २६ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता होईल. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली ३८ वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. राजर्षी शाहू महाराजांच्या १५१व्या जयंती दिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस १९८४ पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२५ चा राजर्षी शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना दिला जाणार आहे.
१९८४ पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, चित्रपती व्ही. शांताराम, शाहीरविशारद पिराजीराव सरनाईक, वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, गायिका आशा भोसले, प्रा. एन. डी. पाटील, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग, पन्नालाल सुराणा आदी ३८ मान्यवरांना मिळाला आहे.
——————————————————-
राजर्षी शाहू पुरस्कार डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28
°
C
28
°
28
°
83 %
8.3kmh
17 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°