कोल्हापूर :
डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील ६ विद्यार्थ्यांची सॉफ्टएन्जर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामवंत आयटी कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४.७० लाख वार्षिक पॅकेजची ऑफर देण्यात आली आहे.
महाविद्यालयात झालेल्या प्लेसमेंट ड्राइव्ह प्रक्रियेसाठी सॉफ्टएन्जर इंडिया प्रा. लि. कंपनीकडून एच.आर. अमृता भणगे, हेड टेक्निकल ट्रेनिंग मॅनेजर यतीन पवार, सीमा भोईटे व शुभांगी चौगुले उपस्थित होते.
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत व वैयक्तिक मुलाखतीच्या माध्यमातून पार पडली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती ट्रेनी इंजिनिअर प्रोजेक्ट हेड या पदावर करण्यात आली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, तसेच विश्वस्त ऋतुराज पाटील आणि तेजस पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ. शिवानी काळे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रिती भोसले, कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागातील विभागीय प्रशिक्षण व प्लेसमेंट समन्वयक प्रा. वीरा रावल व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरच्या ६ विद्यार्थ्यांची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
29.9
°
45 %
3.1kmh
0 %
Sun
29
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

