मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधी
• डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे आयोजन
कोल्हापूर :
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल जबाबदारी, नेतृत्वगुण आणि संवादकौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे ‘सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स (एमयूएन) २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातील निवडक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील एमयूएनमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे .
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘स्टे सेफ ऑनलाइन’ उपक्रमासह इंडियन सायबर सिक्युरिटी एक्सलन्स असोसिएशन, डिजिटल इंडिया, सी-डॅक आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक  यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे.
इयत्ता ८ वी ते १०वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणारा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसोबत प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाला सहभागी होता येणार आहे. या उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मॉडेल युनायटेड नेशन्सच्या कार्यपद्धतीचा अनुभव, विविध जागतिक विषयांवर चर्चा, सार्वजनिक भाषण, संशोधन, नेतृत्व आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमातील निवडक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील एमयूएनमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य पारितोषिके व सन्मान देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, ऑनलाइन सुरक्षितता आणि जबाबदार डिजिटल नागरिकत्व याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, शिक्षक समन्वयक म्हणून प्रा. अमृत काजवे, तर विद्यार्थी समन्वयक म्हणून कु. अंजिलाह धलाईत आणि कु. युगंधर साळुंखे काम पाहतील.
इच्छुक शाळांनी अधिक माहितीसाठी डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.5 ° C
28.5 °
28.5 °
65 %
2.9kmh
1 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page