कोल्हापूर :
दृष्टिबाधित व्यक्तींपर्यंत बातम्या आणि महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या ‘दृष्टी’ उपक्रमांतर्गत प्रकाशित होणारी हिंदी आणि मराठी भाषेतील ब्रेल वृत्तपत्रे आता पाक्षिकाऐवजी साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामुळे वाचकांना दर आठवड्याला देश-विदेशातील घडामोडी जाणून घेता येणार आहेत. रिलायन्स फाउंडेशनतर्फे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (एनएबी) इंडिया यांच्या सहकार्याने ही वृत्तपत्रे प्रकाशित केली जातात. या वृत्तपत्रांचे वाचकसंख्याबळ ३० हजारांहून अधिक आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता एम. अंबानी या दृष्टिबाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. याच वर्षी जानेवारीमध्ये मुंबई येथे एनएबी इंडियाच्या ७५ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी फाउंडेशनतर्फे पाच कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. ब्रेल वृत्तपत्रांचे साप्ताहिक प्रकाशन हा याच उपक्रमाचा एक भाग आहे. या निर्णयामुळे दृष्टिबाधित व्यक्तींना बातम्या आणि महत्त्वाच्या माहितीपर्यंत नियमितपणे पोहोचता येईल. तसेच, देश-विदेशातील घडामोडींशी त्यांचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल.
रिलायन्स फाउंडेशनच्या ‘दृष्टी’ उपक्रमाची सुरुवात २००३ मध्ये झाली. गरजू व्यक्तींना उत्तम नेत्रसेवा उपलब्ध करून देणे आणि दृष्टिबाधित व्यक्तींचे जीवन अधिक सुलभ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत मोफत नेत्रतपासणी, कॉर्निया प्रत्यारोपण आणि चष्म्यांचे वाटप यांसारख्या सेवा पुरवल्या जातात. या सेवा अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी फाउंडेशनने एनएबी इंडिया, शंकरा आय फाउंडेशन आणि अरविंद आय केअर सिस्टीम यांच्याशी भागीदारी केली आहे.
फाउंडेशनच्या माहितीनुसार, ‘दृष्टी’ उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्यक्तींना मदत करण्यात आली आहे. याशिवाय, २२,५०० हून अधिक व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळवून देण्यासाठीही मदत करण्यात आली आहे. गरजू व्यक्तींना दर्जेदार नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याबरोबरच दृष्टिबाधित व्यक्तींना आत्मविश्वासाने जीवन जगण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देणे, हे या प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. ब्रेल वृत्तपत्रांचे साप्ताहिक प्रकाशन या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे वाचकांना बातम्या, चालू घडामोडी आणि समाजाशी संबंधित महत्त्वाची माहिती अधिक नियमितपणे उपलब्ध होईल.
——————————
नीता अंबानी यांच्या पुढाकारातून दृष्टिबाधितांसाठी आता दर आठवड्याला ब्रेल वृत्तपत्र
Mumbai
clear sky
28.5
°
C
28.5
°
28.5
°
65 %
2.9kmh
1 %
Tue
28
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
30
°
Sat
29
°

